नितीश कुमार नामधारी मुख्यमंत्री, भाजप वापरून फेकून देणार; मनोज सिन्हा यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून जदयुचे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण नितीश कुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका भाजपचे माजी नेते मनोज सिन्हा यांनी केले आहे. तसेच भाजप नितीश कुमार यांचा वापर करून फेकून देतील असेही सिन्हा म्हणाले आहेत.


सिन्हा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भाजप आपल्या मित्रांना आणि शत्रूंना मरेपर्यंत वापरून घेतत. नितीश कुमार हे त्याचे ताजे उदाहरण आहेत. नितीश कुमार हे भाजपचे नामधारी मुख्यमंत्री असतील. असेही सिन्हा म्हणाले.

बिहारमध्ये जदयुपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी जाहीर केले होते की, जरी भाजपच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार. निवडणूक निकालानंतर नितीश कुमार मुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते. पण मित्रपक्षांनी आग्रह केल्याने नितीश कुमार यांनी ही जवाबदारी स्विकारली.