दिंडोशी रक्तदान, आरोग्य शिबिरांचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणदिनी शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रमांतून त्यांना मानवंदना दिली जात आहे. दिंडोशी येथेही शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी हे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दिंडोशीत  शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू, विभाग संघटक साधना माने, युवासेना सचिव किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून 22 नोव्हेंबर रोजी शिवसेना व युवासेना दिंडोशी विधानसभेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत युवासेना शाखा क्रमांक 36, 39, 40, 41 द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. युवासेना शाखा क्रमांक 37 द्वारे 100 गरिबांना मोफत शिवभोजन, युवासेना शाखा क्रमांक 38 द्वारे मोफत वैद्यकीय कार्ड वाटप, युवासेना शाखा क्रमांक 42 द्वारे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

दिंडोशी विधानसभा क्षेत्र युवासेनेने आयोजत केलेले सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, रीना सुर्वे, पूजा चौहान, सर्व महिला व पुरुष उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सहकार्य करत आहेत, अशी माहिती युवासेना विभाग अधिकारी प्रशांत मानकर यांनी दिली.