गोव्यातून दारू आणून पुण्यात बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1166 विदेशी दारू बाटल्या, बनावट स्टीकर्स, टेम्पो असा 7 लाख 11 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई कोथरूडमधील न्यू डीपी रोड परिसरात करण्यात आली.
गोविंद पुखराज कुमावत (रा. वारजे ) आणि अमित विठ्ठल राउत (रा. कोथरूड ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात तयार करण्यात आलेल्या दारू पुण्यात आणून व्रिव विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दारूवरील लेबल काढून त्यावर जादा दर टावूâन विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने अमितच्या मदतीने दारूविक्री केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बाळासो बढे, सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, विलास ढोले, कांबळे, कानवडे, मनोज पवार, भास्कर बुचडे यांच्या पथकाने केली.























































