बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणतात देशाचे पंतप्रधान नितीश कुमार, भाजप नेत्यालाच मोदींच्या नावाचा विसर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत याचा विसर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते तार किशोर प्रसाद यांना पडला आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून नितीश कुमार यांचे नाव घेतले आहे. इतकेच नाही, तर बिहारच्या दुसऱ्य़ा उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी 20 हजार 20 सुरू असल्याचे म्हटले आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहारचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री तार किशोर प्रसाद माध्यमांशी बोलत होते. तेव्हा गेली 15 वर्षे देशाचे पंतप्रधान नितीश कुमार, सुशील मोदी असल्याचे ते म्हणत होते. इतकेच नाही तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नावही आठवत नव्हते. तेव्हा शेजारच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सांगितले.


20 हजार 20

तर दुसरीकडे बिहारच्या दुसऱ्य़ा उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी सध्या 20 हजार 20 सुरू असल्याचे म्हटले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रेणू देवी म्हणाल्या की 1988 पासून मी पक्षात कार्यरत आहे. पक्षाने नेहमीच माझ्या कामाची कदर केली असून मला बक्षीस दिले आहे. सध्या 20 हजार 20 सुरू आहे आजही पक्षाने मला भेट दिली आहे.

चौफेर टीका

काही दिवसांपूर्वी बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांना राष्ट्रगीत म्हणता येत नव्हते. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता दोन बड्या नेत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने भाजपवर चौफेर टीका होत आहे.