परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला 14000 फुट उंचावरील हरकीदून पर्वत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील हरकीदून हा पर्वत आहे परभणीच्या हौशी गिर्यारोहकांनी सर केला. अनुभवी गिर्यारोहक हर्षादित्य बिजापूरी यांच्या नेतृत्वाखाली रणजित कारेगांवकर व  विष्णू मेहत्रे यांनी हा पर्वत सर केला आहे.  या दोघांनी सौरभ सेमवाल यांच्या सहकार्याने आणि रामलाल गाईडच्या दिशादर्शनानुसार 20 ते 22 नोव्हेंबर या तीन दिवसात पर्वत सर केला आणि ते खाली उतरले देखील. धबधबे, झरे, झाडं, बर्फ, पक्षी, डोंगर, दर्‍या, चांदणीरात्र व सुपीन नदीचा खळखळाट यांचा मनसोक्त आनंद घेत व उणे 10 सेल्सिअस तापमानाच्या थंडीत एकमेकाला धीर देत या गिर्यारोहकांनी हा पर्वत सर केला.  परतीच्या वेळ  सौरभ सेमवाल  हे घसरून पडल्याने त्यांच्या पायाला मुका मार लागला होता. थंडीमुळे त्यांना चालणं अवघड झालं होतं. मोहीमप्रमुख हर्षादित्य यांनी त्यांना आधार दिला आणि एका ठिकाणी थांबत  स्ट्रेचींग करून आराम दिला.