
फायझर कंपनीने लसीच्या नोंदणीसाठी अमेरिकेत अर्ज केला असून या लसीला शासकीय मान्यता मिळाली तर जगातील प्रत्येक भागात ही लस पोहचविण्यासाठी चार्टर्ड विमानांच्या उड्डाणाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळेच फायझर कंपनीने अमेरिकेत कोरोनाची लस जगभरात पोहचविण्यासाठी चार्टर्ड विमानांचा वापर सुरू केला आहे. शुक्रवारपासून युनायटेड एअरलाइन्सने या उड्डाणांची सुरुवात केल्याची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलच्या सूत्रांनी दिली आहे. या सूत्रानुसार फायझर लसीची पहिली तुकडी मिशिगन आणि विसकाॅन्सीनच्या गोडाउनमध्ये साठविण्यात येणार आहे. त्याच वेळेला बेल्जियम आणि जर्मनीतदेखील याची साठवणूक होईल, असे सांगण्यात येत आहे.
जगात 6.19 कोटींपेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे
अमेरिकेतल्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांचा बोजा वाढत आहे. एका आकडेवारीनुसार इथल्या रुग्णालयांत दाखल झालेल्या कोरोना बाधितांची संख्या अवघ्या एका महिन्यात दुपटीने वाढली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संक्रमणावर मात करणाऱया जर्मनीत कोरोनाची प्रकरणे दहा लाखांवर गेली आहेत. त्याच वेळेला जगात कोरोना रुग्णांच्या संख्येने 623 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर 4 कोटी 30 लाखाहून अधिक लोक या कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.





























































