डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि आनंदवनच्या प्रमुख डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्युप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांची फॉरेन्सिक टीम त्यांच्या आनंदवन येथील घराची तपासणी करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूबाबत अधिकृत माहिती देता येईल, असं पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. शीतल आमटे यांनी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली होती. सध्या त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन चंद्रपूर इथं सुरू आहे.