
गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पालख्या डोंगरात नागरीकांना रविवारी दुपारी पाच वाजता वन्य प्राणी दिसताच शहरात व परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ सर्वत्र पसरला व भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा दिसलेला प्राणी बिबट्या नसुन तरस असण्याची शक्यता वनरक्षक गाडेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांनी भिती न बाळगता आपली व आपल्या कुटुंबायांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने चांगला धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने तिघांवर हल्ला करुन ठार केल्यानंतर आष्टी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सध्या हे भितीचे वारे बीड जिल्ह्यात सर्वत्र वाहु लागले होते रविवार गेवराई तालुक्यातील मन्यरवाडी येथील काही तरुण शहरा जवळच असलेल्या पालख्या डोंगरावर जात असताना त्यांना लांब डोंगरावर एक बिबट्या सारखा दिसणारा वन्य प्राणी डोंगरावर मुक्त संचार करीत असताना दिसला तर यांनी ताबडतोब त्याचा व्हिडिओ मोबाईलवर काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे परिसरात बिबट्या असल्याची एकच खळबळ उडाली व भितीचे वातावरण निर्माण झाले.
परंतु या विषयी वनरक्षक गाडेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिसलेला प्राणी बिबट्या नसुन तरस असण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच नागरिकांनी भिती न बाळगता आपली व आपल्या कुटुंबायांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.





























































