पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अरुण लाड विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. निवडणुकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते. या निवडणुकीत विजयी झालेल्या अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले. त्यापैकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.