
अवघ्या जगाला प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोरोना लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे पालिकेनेही ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. यामध्ये पाच टप्प्यात लसीकरण होणार असून पहिल्या टप्प्यात सवा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रत्येकी 5 कर्मचाऱयांची 500 पथके तयार ठेवण्यात येणार असून अडीच हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त आणि सिटी टास्क पर्ह्सचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांनी महत्त्वपूर्ण बैठकीबाबत ही माहिती दिली.
मुंबईत कोरोना चांगलाच आटोक्यात आला असून जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने लसीच्या साठवणुकीसाठी कांजूर मार्ग येथे विशेष कोल्ड स्टोरेज सेंटर तैनात ठेवले आहे. याशिवाय पालिकेच्या चार मोठय़ा रुग्णालयांमध्येही लस साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज यंत्रणा तयार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. लसीकरणासाठी एकूण 500 पथके तयार करण्यात येतील. कोरोना लस सुरुवातीला केवळ पालिकेच्या माध्यमातून दिली जाईल. कोणत्याही खासगी संस्थेला याची परवानगी नसेल. ही लस मोफत दिली जाईल की पैसे आकारले जातील याचा निर्णय केंद्र आणि राज्य स्तरावरील सूचनेनुसार घेतला जाईल असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
असे आहेत पाच टप्पे
– कोल्ड स्टोरेज यंत्रणा, शितपेटय़ा व्यवस्था करणे.
– निर्धारित तापमानात लसींची व्हॅक्सिनेशन सेंटरपर्यंत वाहतूक. व्हॅक्सिनेशन सेंटर प्रत्यक्ष कामासाठी तयार ठेवणे.
– प्रत्यक्ष लसीकरण सुरू करून आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण. 21 ते 28 दिवसानंतर दुसरा डोस.
– यानंतर प्रंट लाईन कर्मचाऱयांना लस देणार.
– 50 वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्यांना लस देणे. यानंतर सर्वसामान्यांना लस.
आठ ठिकाणी होणार लसीकरण
मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालय, परळ येथील केईएम आणि शिव येथील लोकमान्य टिकळ रुग्णालयात लसीकरण होईल. तर उपनगरातील पुर्ला भाभा, विद्याविहार राजावाडी, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात लसीकरण करण्यात येईल. यानंतर जंम्बो कोविड केंद्रांमध्येही लसीकरण केंद्र तयार करण्यात येईल अशी माहिती काकाणी यांनी दिली.
प्रत्येकाची नोंद केंद्रीय स्तरावरील अॅपवर
– लस घेणाऱया प्रत्येकाची नोंद केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅपवर करण्यात येईल. यावर रजिस्टर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर अॅपवर ओटीपी येईल. यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल.
– व्हॅक्सिनेशन केंद्रावर पाच कर्मचारी असतील. यामध्ये ओळख करणारा कर्मचारी, लस देणारा कर्मचारी, मदतनीस, सुरक्षा आणि एक अतिरिक्त कर्मचारी असेल. लसीकरणासाठी ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतील सर्वेक्षणाचा उपयोग होणार.


























































