मुंबईत दिवसभरात 606 कोरोना रुग्ण, 402 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग पंधराव्या दिवशीही कोरोना रुग्णांची संख्या हजारच्या आत आली आहे. रविवारी दिवसभरात 606 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 402 जण कोरोनामुक्त झाले.

मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू आज झाल्याने एकूण मृतांची संख्या 10 हजार 981 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 162वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 318 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजार 654 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 20 लाख 91 हजार 138 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 629 वर पोहोचली आहे.