
लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटनेतील आणखी एका जखमीचा आज मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. दरम्यान, तिघा जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून केईएम आणि मसिनामध्ये सात जणांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत 16 जण होरपळले होते.
लालबाग येथील साराभाई इमारतीमध्ये 6 डिसेंबरला लग्नघरात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी विनायक शिंदे (57) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुर्घटनेतील 16 जणांपैकी केईएम रुग्णालयात 12 जणांवर उपचार सुरू होते. त्यातील 6 जण मृत्युमुखी पडले असून तिघांवर उपचार सुरू आहेत तर तिघांना घरी सोडण्यात आले तर भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अंबिके कुटुंबीयांतील चौघांवर उपचार सुरू आहेत.




























































