‘एक लिटर’ इंधनात विमान किती मायलेज देते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाल पंख असलेले, 200 ते 300 लोकांना घेऊन सहज आकाशात झेप घेणारे विमान एक किलोमीटर चालण्यासाठी किती इंधन वापरत असेल? हे जाणून घेणे तुमच्यासाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरणार आहे. याबद्दल कदाचितच काही लोकांना माहित असेल. मात्र असे अनेक लोक असतील जे विमानाने तर प्रवास करतात पण त्यांना ह्याचे उत्तर ठाऊक नसेल. आज आम्ही तुम्हाला याच बद्दल माहिती सांगणार आहोत.

एका बोईंग वेबसाईटच्या आकड्यांनुसार, बोईंग 747 विमानामध्ये एक गॅलन (जवळपास 4 लिटर) इंधन प्रत्येक सेकंदाला लागते. बोईंग 747 सारखे विमान 1 लिटर इंधनामध्ये किती अंतराचा प्रवास करू शकते, तर फक्त 0.08 किलोमीटर एवढे अंतर कापू शकते. विमानातील प्रवासी आणि सामान याचा इंधन वापरासाठी सम प्रमाणात (Directly propotionate ) संबंध आहे. आणखीन थोडे पुढे जाऊन विमानाचे तिकीट प्रति मानसी असल्याने, तो खर्च पण आर्थिक गणिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे.

बोईंग 747 विमान बद्दल सांगायचे झाल्यास, हे विमान एका किलोमीटरमध्ये 12 लिटर इंधन खर्च करते. म्हणजेच हे विमान 500 प्रवाश्याना घेऊन जाण्यासाठी 12 लिटर इंधनामध्ये जवळपास 1 किलोमीटरचा प्रवास करते. यानुसार हे विमान एका किलोमीटरमध्ये प्रतिव्यक्तीवर 0.024 लिटर इंधन खर्च करते.

विमानाला एक जास्तीत जास्त (cruising speed ) मायलेज देणारा वेग असतो, हा वेग नियंत्रणात ठेवण्यात वैमानिकाला कौशल्य हस्तगत असेल तर त्या विमानाचा इंधन वापर नियंत्रित करणे शक्य असते.

A 321 एअर बस एक तासात 600 की.मी. अंतर म्हणजे एका मिनिटात 10 की.मी. जाते. एक तासात 192 प्रवाशांची क्षमता असलेली एअर बस 2508 लिटर इंधन वापरते. याचे गणित प्रति सेकंदात 0.683 लिटर इंधनाचा वापर होतो आणि एक मिनिटात 41.8 लिटर इंधन लागते आणि 10 की. मी. अंतर कापते. म्हणजे एक की.मी. अंतरासाठी 4.18 लिटर इंधन लागते.

एकंदरीत बोइंग 747 विमान एक लिटर मध्ये 0.08 की.मी तर एअर बस एक लिटर मध्ये 0.24 की.मी. जाते. प्रतिव्यक्ती/ प्रति की.मी. बोइंग 747 ला 0.024 लिटर इंधनाचा वापर करते. तर A 321 एअर बसला हेच प्रमाण 0.022 आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना एकनाथ वाघ यांनी ही माहिती दिली.