
ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर आहे. बस आणि ट्रेनप्रमाणे आता ज्येष्ठ नागरिकांना देशांतर्गत हाफ तिकिटावर विमान प्रवासदेखील करता येणार आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या देशातील कोणत्याही नागरिकाला एअर इंडियाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. ही ऑफर तिकीट जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असून प्रवासापूर्वी किमान सात दिवस आधी बुकिंग आवश्यक आहे.
या आहेत अटी
- जन्मतारखेचा उल्लेख असलेले वैध फोटो आयडी सोबत असावे.
- इकोनॉमी केबिनमध्ये बुकिंग कॅटेगरीसाठी मूळ भाडय़ाच्या 50 टक्के भाडे द्यावे लागेल.





























































