बाबा का ‘ढाबा’ नव्हे ‘रेस्टिरंट’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावरील क्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या दिल्लीतील ’बाबा का ढाबा’चा आता कायापालट झाला असून त्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर झाले आहे. ढाब्याचे मालक कांताप्रसाद यांनी आधीच्या ढाब्यापासून हाकेच्या अंतरावरच हे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ढाब्यावर ग्राहक फिरकत नाहीत, म्हणून एकेकाळी रडणारे हेच 80 वर्षीय कांताप्रसाद आता रेस्टॉरंटमध्ये आरामदायी खुर्चीवर बसून हिशोब करताना दिसतात. जेवणकामासाठी त्यांनी तिघा जणांचा स्टाफही ठेवलाय. युटय़ूबर गौरव वासन याने लॉकडाऊनच्या काळात मालवीय नगर इथल्या ’बाबा का ढाबा’ला प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर अनेक सेलिब्रेटींनीदेखील कांताप्रसाद यांना मदतीचे आवाहन केले होते. मात्र ज्या गौरवने प्रसिद्धी मिळवून दिली त्याच्यावरच पैशांची अफरातफरी केल्याचा आरोप केल्यामुळे कांताप्रसाद चर्चेत आले होते.