
राव आणि अॅलन ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे नोंदणी क्रमांक (इंडेक्स क्रमांक) नसल्याने या काँलेजमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शिक्षण मंडळाने स्वीकारलेले नाहीत. याविरोधात कॉलेजधील 400 विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
दोन्ही कॉलेजनी शिक्षण विभागाची कागदोपत्री पूर्तता न केल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक नोंदणी क्रमांक (Index No) देण्यात आलेला नाही. परिणामी या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शिक्षण मंडळाकडून स्वीकारले जात नाहीत. सदर बाब मागील चार वर्षे सातत्याने घडते आहे; परंतु विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी विशेष सवलत देऊन दरवर्षी अर्ज स्वीकारले जातात पण या कॉलेजांवर कोणतीही कारवाई होत नाही. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे व शीतल देवरुखकर-शेठ यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे कॉलेजविरोधात तक्रार केली आहे.

























































