
दारूच्या वादातून एकाने ओळखीतील दोन तरुणांवर इमारत बांधमादरम्यान वापण्यातये णाऱ्या लोखंडी सळईने हल्ला करून खून केला. ही घटना आज सकाळी 10 वाजून 50 मिनीटांनी बिबवेवाडीतील श्रीजी लॉन्ससमोर घडली. दिवसाढवळ्या दोन तरूणाचा खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे भीतीपोटी स्थानिकांनी तत्काळ दुकाने बंद केली होती. घटनास्थळी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
सलीम मेहबूब शेख आणि तौफिक शेख अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. अनिल कचरावत असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम आणि अनिल एकमेकांच्या ओळखीतील आहेत. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सलीम श्रीजी लॉन्समोरील गल्लीत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या अनिलने त्याच्यासोबत वाद घातला. दररोज सलीम फुकटची दारू पीत असल्याचा आरोप करीत अनिलने त्याच्या डोक्यात इमारत बांधमादरम्यान वापण्यात येणाऱ्या लोखंडी सळईने वार केला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सलीमचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी सलीमला जेवणसाठी डबा घेउन आलेल्या तौफिकला अनिलने पाहिले. त्याचाही राग आल्यामुळे लोखंडी सळई घेउन त्याचा पाठलाग केला. श्रीजी लॉन्समोर अनिलने तौफिकच्या डोक्यात सळईन मारहाण केली. त्यामुळे तौफिक जागेवर खाली कोसळला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, वाद सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर अनिल हातात सळई घेउन रस्त्याने बिनधास्तपणे फिरत होता. त्यानंतर एका वाहतूक कर्मचाऱ्याने त्याला पाहून ताब्यात घेतले.
कोट-दारूच्या वादातून आरोपीने ओळखीतील तरूणावर लोखंडी शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.
राजेश उसगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे



























































