
पुण्यात काही दिवसांपूर्वी गवा घुसल्याचा मोठाच गवगवा झाला होता. आता कोल्हापूर शहरालगत लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा परिसरात शुक्रवारी रोजी रात्री चार गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
शुक्रवारी रात्री शहरातील उत्तरेश्वर पेठेकडून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर या गव्यांचा कळप रस्ता ओलांडताना आढळून आला. या गव्यांच्या कळपाचा एक व्हिडिओ सोशल मिडियातुन व्हायरल होत असल्याने परिसरात नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे.
दरम्यान, याची माहिती मिळताच वन विभागासह अग्निशमन आणि पोलिस दलही घटनास्थळी दाखल झाले असून खबरदारीसाठी या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली होती. वन विभागाकडुन या गव्यांचा शोध सुरू आहे.




























































