जम्मू-कश्मीरला मिळाली पहिली  महिला बसचालक, पूजादेवी यांचे स्वप्न झाले साकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरला नुकतीच पहिलीवहिली महिला बसचालक मिळाली आहे. काठुआ येथे राहणाऱया 30 वर्षीय पूजादेवी या जम्मू-कश्मीरमधील पहिल्या महिला बसचालक ठरल्या आहेत.सध्या जम्मू ते कठुआ या मार्गावर त्या व्यावसायिक बस चालवत असून त्यांना पाहून बसप्रवाशांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्या या जिद्दीला सलाम केला आहे.

बालपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड असलेल्या पूजादेवी या काठुआ जिह्यातील संधार बसोहली या गावातील रहिवासी. मेठे वाहन चालवण्याचे बालपणापासूनच त्यांचे स्वप्न होते. बुधवारी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. जम्मू ते काठुआ ही पहिली ट्रीप पूर्ण केल्यानंतर त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. बसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी जम्मू काठुआ रोड बस युनियचे अध्यक्ष सरदार पुलदीप सिंग यांची भेट घेतली. त्यांना आपली इच्छा सांगितल्यानंतर ते हैराण झाले. त्य़ानंतर त्यांनीच आपले हे स्वप्न पूर्ण केल्यासाठी मदत केल्याचे पूजादेवी यांनी सांगितले

इतर महिलांना देणार प्रशिक्षण

पूजादेवीचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. त्यांचे सार्वजनिक वाहन चालवणे घरातल्यांना मंजूर नव्हते. परंतु पूजादेवी यांनी घरातल्यांची समजूत काढत त्यांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाड़ले. अन्य महिलांनादेखील प्रशिक्षण देण्याची आपली इच्छा असल्याचे त्या सांगतात.