31 डिसेंबरपूर्वी हे काम आठवणीने करा! अन्यथा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मुंबईच्या अनेक रस्त्यांवर नागरिक वाहने घेऊन घराबाहेर पडत आहेत. त्यामळे रस्त्यांवर ट्राफिक होत आहे.

कोरोनामुळे अत्यंत वाईट ठरलेलं 2020 हे वर्षं संपायला आता काहीच दिवस राहिले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक सरकारी आणि खासगी कामांना खीळ बसली होती. ती कामं करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

यातच एक महत्त्वाचं काम आहे, जे राहून गेलं तर दंड भरावा लागू शकतो. आणि ते काम म्हणजे वाहन परवान्याचं नूतनीकरण होय. वाहनचालकांनी आपला वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि फिटनेस प्रमाणपत्रांचे 31 डिसेंबरपूर्वी नूतनीकरण करावे. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास दंड भरावा लागेल.

काही कागदपत्रांची मुदत फेब्रुवारीपासूनच संपलेली आहे. तेव्हा अशांवर दंडात्मक कारवाई करायची की त्यांच्या मुदतीत वाढ करायची हा निर्णय कोरोना महामारीमुळे सरकार अद्याप घेऊ शकलेले नाही.

व्यावसायिक वाहनचालकांनी याबाबत सरकारला सूचना केली आहे की, त्यांच्या क्षमतेहून जास्त संख्येने वाहने रस्त्यावर फक्त उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा येतो, अशा वाहनांसाठी परवाना नूतनीकरण मुदत वाढीत शिथिलता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या शाळा बंद असल्यामुळे जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत तोपर्यंत शाळेची बसही सुरू होणार नाही. त्यामुळे त्यांच्या  वाहन परवाना नूतनीकरणाची मुदत वाढवावी. जेणेकरून गर्दी होणार नाही. तसंच निर्णय घेण्यापूर्वी अशा प्रकारच्या अन्य समस्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी चालकांकडून होताना दिसत आहे.