
गुटखा प्रकरणात खंडणी मागणारा तसेच अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी लालमोहम्मद जहागीरदार हा स्वतःहून श्रीरामपूर पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालय हजर केले असता त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जहागीरदार हा टिळकनगर परिसरात राहत असून या परिसरात पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. या प्रकरणात अडकावयाचे नसेल तर दोन लाख रुपये द्यावे लागेल, अशी मागणी नुरमोहम्मद शेख आणि अर्जून मकासरे यांच्याकडे केली होती.
शेख व मकासरे यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी लालमोहम्मद जहागीरदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शहर पोलीस जहागीरदार याचा शोध घेत होते.
दरम्यान, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर जहागीरदार स्वतःहून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालय हजर केले असता त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
नुरमोहम्मद शेख आणि अर्जून मकासरे यांची टिळकनगर परिसरातील रस्ता अडवणूक करून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास एकलहरे येथील अवैध गुटखा प्रकरणात अडकविण्याची धमकी लालमोहम्मद जहागीरदार याने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले होते, असे पोलिसांनी सांगितले.



























































