
मेलबर्न कसोटीचा पहिला दिवस गाजवणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाने दुसऱया दिवशीही जबरदस्त कामगिरी केली. कर्णधार अजिंक्य रहाणेचे 12 वे संयमी शतक आणि शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत व रवींद्र जाडेजा यांच्या महत्त्वपूर्ण खेळींच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱया दिवसअखेरीस 5 बाद 277 धावा फटकावल्या आणि पहिल्या डावात 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडलेल्या झेलांचाही त्यांच्या खेळावर परिणाम झालेला दिसला.
Another dominant day of Test cricket for #TeamIndia.
It was a day that is undoubtedly headlined by Captain @ajinkyarahane88, whose century (104* off 200) will go down as one of the best by an Indian captain on foreign soil.#TeamIndia 277/5 (Rahane 104*, Jadeja 40*) pic.twitter.com/zwuHWWHYjP
— BCCI (@BCCI) December 27, 2020
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव –सर्व बाद 195 धावा
हिंदुस्थान पहिला डाव
5 बाद 277 धावा (शुभमन गिल 45 धावा, अजिंक्य रहाणे खेळत आहे 104 धावा, रिषभ पंत 29 धावा, रवींद्र जाडेजा खेळत आहे
40 धावा, स्टार्प 2/61, कमिन्स 2/71).
या आकडेवारीवर एक नजर
मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीत दोन शतके झळकावणारा अजिंक्य रहाणे परदेशातील पहिलाच फलंदाज ठरलाय. याआधी 2014 साली त्याने याच ग्राऊंडवर 147 धावांची खेळी साकारली होती.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दोन शतके झळकावणारा अजिंक्य रहाणे हा हिंदुस्थानचा दुसराच फलंदाज ठरलाय. याआधी विनू मंकड यांनी ही किमया साधली होती.
मेलबर्न या जगातील प्रतिष्ठsच्या स्टेडियममध्ये शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे हा हिंदुस्थानचा दुसराच कर्णधार ठरलाय. याआधी 1999 साली सचिन तेंडुलकरने ही करामत केली होती. तसेच याच ग्राऊंडवर 2004 सालानंतर शतक झळकावणारा तो मोहम्मद युसूफनंतरचा पहिलाच परदेशी कर्णधार ठरलाय.
पॅट कमिन्सने चेतेश्वर पुजाराला बाद करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 बळी मिळवले. अशी कामगिरी करणारा तो दहावा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरलाय.
मिचेल स्टार्पने रिषभ पंतला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी गारद करण्याची करामत केली. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा नववा गोलंदाज ठरलाय. त्याने ही किमया 59 कसोटींमध्ये केलीय.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन याने रिषभ पंतचा झेल टिपला. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 150 झेल टिपले. 33 कसोटींमध्ये त्याने हा टप्पा ओलांडताना क्विंटॉन डी कॉकच्या 34 कसोटींमधील विक्रमाला मागे टाकले. एवढेच नव्हे तर त्याने 63 डावांमध्ये हे साध्य केले.
पहिल्या सत्रात कांगारूंचे वर्चस्व
मेलबर्न येथील कसोटीत दुसऱया दिवशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना याचा फायदा घेता आला. पहिल्या सत्रात हिंदुस्थानी फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवले. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी 61 धावांची भागीदारीही केली. पण पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर शुभमन गिल 45 धावांवर टीम पेनकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली. शुभमन गिलला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर धावफलकावर तीन धावांची भर पडताच पॅट कमिन्सनेच चेतेश्वर पुजाराला 17 धावांवर पुन्हा टीम पेनकरवी झेलबाद करीत हिंदुस्थानला तिसरा धक्का दिला. त्यामुळे उपहारापर्यंत हिंदुस्थानची अवस्था 3 बाद 90 धावा अशी झाली.
तीन महत्त्वपूर्ण भागीदाऱया
कर्णधार अजिंक्य रहाणे याने दुसऱया दिवशी तीन महत्त्वपूर्ण भागीदाऱया रचल्या. या कसोटीसाठी त्या निर्णायक ठरतील. सुरुवातीला हनुमा विहारीच्या (21 धावा) साथीने 52 धावांची, त्यानंतर यष्टिरक्षक रिषभ पंतच्या (29 धावा) साथीने 57 धावांची आणि अखेर रवींद्र जाडेजाच्या (नाबाद 40 धावा) साथीने नाबाद 104 धावांची भागीदारी करताना त्याने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या डावात जास्तीत जास्त आघाडी घेता येईल यासाठीही सर्वस्व पणाला लावले. अजिंक्य रहाणे 200 चेंडूंत 12 चौकारांसह नाबाद 104 धावांवर खेळत असून त्याच्यासोबत रवींद्र जाडेजा एक चौकारासह 40 धावांवर खेळत आहे. आता उद्या ही जोडी आणि तळाचे फलंदाज कशी कामगिरी करताहेत त्यावर हिंदुस्थानी संघ किती धावांची आघाडी घेतोय हे अवलंबून असणार आहे.




























































