
कोरोना महामारीत सहा महिन्यांची मुदतवाढ मिळूनही आयकर परतावा न केलेल्या नोकरदारांची चांगलीच धावाधाव उडाली आहे. 31 डिसेंबरची डेडलाइन जवळ आली आहे. त्यातच आयकर रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या कार्यालयात मोठय़ा प्रमाणावर फाईल्स येऊन पडल्या आहेत. बऱयाच सीएच्या कार्यालयांत ‘वर्पलोड’मुळे फुरसत नसल्याचेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दंडाच्या कारवाईची चिंता सतावू लागली आहे.
आयकर विभागाने आयकर न भरणाऱयांविरोधात देशभरात कारवाईची विशेष मोहीम राबवली आहे. वारंवार नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया नोकरदारांवर या मोहिमेअंतर्गत दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. दंडाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी आयकर विभागाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विशेष मोहिमेत निदर्शनास आले आहे. आयकर परताव्यासंदर्भात ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून तसेच कागदोपत्री नोटिसा पाठवण्यात आल्या, मात्र संबंधित लोक आयकर विभागाकडे संपर्प करण्यास टाळाटाळ करीत आहेत.


























































