
शाश्वत शेती अभियानांतर्गत अनुसूचित जमातीच्या (एसटी) उत्कर्षासाठी राबवण्यात येणाऱया परंपरागत कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने आज 50 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी वितरित करण्यात आला नव्हता.
राज्यातील महाविकास आघाडीने अनुसुचित जाती जमाती व इतर मागासवर्गियांसाठी योजना राबवाव्यात अशी सूचना करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. महाविकास आघाडीतील एक पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा समाजातील दुर्बल घटक खास करून दलित, आदिवासी ओबीसी व इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यास कटीबध्द आहे. राज्यातील एसटी-एनटी लोकसंख्येच्या तुलनेत बजेटमध्ये तरतूद करावी असे या पत्रात म्हटले होते. या संदर्भात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.
2019-20 पासून राज्यात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी परंपरागत कृषी विकास योजना राबवण्यात येते. या योजनेत केंद्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के वाटा आहे.

























































