यंदा आंगणेवाडीत फक्त आंगणे कुटुंबियांचीच जत्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा येत्या 6 मार्चला होत आहे. कोरोनाचे सावट या यात्रेवरही पडले असल्याने ही यात्रा आंगणे कुटुंबियांपुरतीच मर्यादित ठेवली आहे. यामुळे ‘जत्रेक जावकच व्हया’ असे म्हणत यात्रेसाठी तयारीत असलेल्या मुंबई, पुणेस्थित कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे. भाविकांच्या होणाऱया गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून भराडी मातेस नमस्कार व आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. असे आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.