
थंडीत तापमानाचा पारा घसरल्याने नदी, तलाव, सरोवर गोठल्याचे तुम्ही पाहिले असेल. काही ठिकाणी कोसळणारे धबधबे, नळाला येणारे पाणी, पानांवरील डवबिं देखील गोठते. मात्र तुम्ही अंडे फोडण्याचा किंवा नूडल्स खाण्याचा प्रयत्न करत असताना ते तुमच्या मुखपर्यंत येण्याआधीच गोठले तर? तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे, पण हे खरे असून हा प्रकार घडला आहे सायबेरिया या देशात.
जगातील थंड प्रदेशात समावेश होणाऱ्या सायबेरिया देशात प्रचंड थंडी पडली आहे. डोंगरावर, घरावर, रस्त्यावर बर्फाची चादर पसरली आहे. याच दरम्यान, सायबेरियामधील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांना या फोटोने बुचकळ्यात टाकले आहे.
प्रचंड थंडीमुळे एक अंडे आणि नूडल्स हवेतच गोठले आहेत. सायबेरियामधील नोवोसीबर्स्क येथील हा फोटो आहे. Oleg (@olegsvn) नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हा फोटो ट्विट केला आहे.
सोशल मीडियावर या गोठलेल्या अंड्याच्या आणि नूडल्सच्या फोटोने आग लावली. 50 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले असून 20 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे, तर 700 हुन अधिक लोकांनी कमेंट केली आहे. क्षणाक्षणाला हा आकडा वाढतच आहे.
काय आहे ट्विट?
Oleg (@olegsvn) नावाच्या ट्विट वापरकर्त्याने फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, माझे होमटाऊन असलेल्या नोवोसीबर्स्क येथील तापमान उणे 45 अंश सेल्सिअस झाले आहे. येथे काय परिस्थिती आहे याचा अंदाजही तुम्ही बांधू शकत नाही. तसेच येत्या काळात तापमान आणखी खाली जाईल असेही तो म्हणतो.





























































