
कोपरगाव शहरातील आयेशा कॉलनी भागातील कत्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात काटवनात बांधलेली 16 लहान मोठी जनावरे भुकेलेली तहानलेली कत्तलीसाठी आणलेली बांधुन ठेवलेली आढळली. या जनावरांची एकूण किंमत 2 लाख 36 हजार 500 रूपये इतकी आहे.
या प्रकरणी वसिम फारुख कुरेशी वय (18), अक्रम फकिर कुरेशी (27), खलील जमाल कुरेशी (36, सर्व रा. आएशा कॉलनी) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 4 रोजी सह पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या पोलीसपथकाने छापा टाकला होता. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल. सुरज अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केलेली व 16 गायीच्या जातीची लहान वासरे, यांना चारा, पाणी न देता क्रूरतेने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली.
या फिर्यादीनुसार, आरोपींवर भादवि कलम 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 5 (अ),(ब),(क)9 व पशु क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल. राजु पुंड करीत आहेत.



























































