
कृषी विधेयकाला विरोध करून दिल्लीत शेतकरी पार मेटाकुटीला आला असताना कणकवलीत मात्र याच कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी भाजपच्यावतीने आज ट्रक्टटर रॅली काढण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉ अनिल बोंडे यांनी या ट्रक्टर रॅलीत सहभाग घेतला.
विशेष म्हणजे कणकवलीत इतक्या मोठय़ा संख्येने ट्रक्टर आले कुठून असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. कणकवलीत मात्र भाजप पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रक्टर रॅलीत हे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले. रॅलीत व जाहीर सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
कोकणातील स्थानिक मुस्लिम मूळचे गाडगीळ किंवा दाते
कोकणातील स्थानिक मुस्लिम हे मूळचे गाडगीळ किंवा दाते होते. कोणीतरी आक्रमण केल्याने ते मुस्लिम झाले, असे आक्षेपार्ह विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवली येथे झालेल्या सभेत केले असून मुस्लिम नागरिकांना हा एक प्रकारे हिणविण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर हिंदूंच्या पावित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.



























































