नव्या अटींमुळे व्हॉटअॅपचे मार्केट डाऊन, युजर्सची सिग्नल अॅपला मिळतेय भरघोस पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या नव्या नियमावलीमुळे युजर्समध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. अनेक युजर्स आता व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून इतर मेसेजिंग अॅपच्या शोधात असून टेलिग्राम आणि सिग्नल अॅपला पसंती मिळत आहे.

मंगळवारपासून व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सना नवीन नियमावलीबाबत नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात केली आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत या अटी स्वीकारल्या नाहीत तर युजर्सचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सिग्नल अॅपला युजर्सची पसंती मिळतेय. आतापर्यंत लाखो लोकांनी हे अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले आहे.

सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ फोन नंबर स्टोअर करतो. तर टेलिग्राम पर्सनल डेटा म्हणून केवळ काॅन्टॅक्ट इंफो, काॅन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो. युजर्सच्या भरघोस प्रतिसादामुळे आम्हाला वेरिफिकेशन कोड पाठवायला उशीर होत आहे. गेल्या दोन दिवसांत आमच्या अॅपला तुफान प्रतिसाद मिळतोय, असे सिग्नल या कंपनीने सांगितले आहे.