Ind Vs Aus – ऑस्ट्रेलियाकडून डाव घोषीत, टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या दिवशी 312 धावांवर डाव घोषीत करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 407 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाकडून फलंदाजीला सुरुवात झाली असून शुभमन गिल व रोहित शर्मा यांनी आश्वासक सुरुवात केली आहे.

पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने उर्वरित 29 षटकांच्या खेळात दुसऱया डावात 2 बाद 103 धावसंख्येपर्यंत मजल मारून आपली आघाडी 197 धावांपर्यंत वाढविली. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 47, तर स्टीव्हन स्मिथ 29 धावांवर खेळत होते. लाबुशेनच्या 73 धावा, स्मिथच्या 81 धावां व कर्मधार पेनने केलेल्या 39 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 407 धावांचे लक्ष्य देत त्यांचा डाव घोषीत केला.

जाडेजा मालिकेमधून बाहेर

हिंदुस्थानी संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत आहे. सिडनी कसोटीच्या तिसऱया दिवशी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. रवींद्र जाडेजा डाव्या हाताच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे या कसोटीसह उर्वरित मालिकेलाही मुकणार आहे. मिचेल स्टार्पच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाला दुखापत झाली होती. रवींद्र जाडेजाला या दुखापतीमधून पूर्णपणे फिट होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहेत. त्यामुळे तो अखेरच्या कसोटीतही खेळू शकणार नाही. यष्टिरक्षक रिषभ पंतची दुखापत गंभीर नसल्यामुळे तो दुसऱया डावात फलंदाजी करू शकतो. दरम्यान, याआधी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल हे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. आता यामध्ये रवींद्र जाडेजाची भर पडली आहे.