
हिंदुस्थान बॅडमिंटनपटूंसाठी गुरुवारचा दिवस निराशाजनक ठरला. सायना नेहवाल हिला महिला एकेरीत, सात्विक रेड्डी-अश्विनी पोनप्पा यांना मिश्र दुहेरीत आणि सात्त्विक रेड्डी-चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीत हार सहन करावी लागली. किदाम्बी श्रीकांत याला दुखापतीमुळे पुरुष एकेरीमधून माघार घ्यावी लागली.
सायना नेहवालला बुसानन ओनबामरनफान हिच्याकडून 23-21, 14-21, 16-21 अशा फरकाने हार सहन करावी लागली. सात्त्विक रेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला मोहम्मद अहसान व हेंद्रा सेतीवान यांच्याकडून 21-19, 21-17 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. चँग चिंग-एनजी विंग यंग यांनी सात्त्विक रेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीला 21-12, 21-17 असे हरवले.































































