
तामिळनाडूच्या दौऱयावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नागपूरचा ‘हाफचड्डीवाला’ कुठल्याही राज्याचे भविष्य ठरवू शकत नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा पाया उद्ध्वस्त करू देणार नाही, असा इशारा राहुल यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱयावर आहेत. रविवारी ठिकठिकाणी रॅली आणि रोड शो घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
चीनच्या सैन्याने हिंदुस्थानच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे. मात्र 56 इंच छाती असलेली व्यक्ती शेजारच्या देशाचे नावही घेऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी केवळ पाच ते सहा उद्योगपतींसाठी देशाचे सरकार चालवताहेत, असा आरोप त्यांनी केला.


























































