
>> जयेश राणे
देशातील कोटय़वधी मोबाईल वापरकर्त्यांचे एका दिवशी एकत्रितपणे अनुमाने तीन कोटी तास ‘30 सेकंदांची कोरोना कॉलरर टय़ून’ ऐकण्यात वाया जात असल्याचे एका अग्रगण्य ग्राहक संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक होता तेव्हा नागरिकांत जागृती करण्याच्या दृष्टीने कोरोना संदेश ऐकवला जाणे एकवेळ समजण्याजोगे होते. धोका टळला नसला तरी संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच याविषयी काय काळजी घेतली पाहिजे याची नीट कल्पनाही आहे. त्यामुळे आता संदेश ऐकवणे थांबवणेच रास्त असेल असा सूर आहे. नको कोरोना, नको कॉलर टय़ून. त्या कॉलर टय़ूनचे महत्त्व केवळ एक ‘औपचारिकता’ एवढेच राहिले आहे. बाकी त्याची फलनिष्पत्ती किती? यापेक्षा त्यामुळे किती तास वाया जातात? याकडे लक्ष केंद्रित करून टय़ूनपासून नागरिकांची सुटका केली पाहिजे. तेव्हा सर्वांचा जीव भांडय़ात पडेल आणि वेळेची बचत होईल यात दुमत नाही. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना टय़ून रद्द करण्यात आल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली. एका जनहित याचिकेद्वारे अमिताभ यांच्या आवाजातील या टय़ूनबाबत आक्षेप घेण्यात आला होता. पण महिलेच्या आवाजातील कोरोना कॉलर टय़ून अद्यापही चालू आहे. त्यामुळे संपका&चे गणितच बिघडले आहे. एक बंद करायचे आणि दुसरे चालू ठेवायचे हा काय खुळचटपणा आहे ?
नोकरी-व्यवसाय चालू झाले आहेत. त्यासाठी संपर्क अनिवार्य असतो. त्यांचा अधिकांश वेळ टय़ून ऐकण्यात खर्च होत असल्याने ते व्यावसायिकदृष्टय़ा तोटय़ाचेच आहे. सेल्स आणि मार्पेटिंगमध्ये काम करणाऱया कर्मचारी वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला असेल, बसत आहे. वेळेचा तोटा भरून काढणे अशक्य असते. कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. ‘Time is Money’ असे इंग्रजीतील एक वाक्य सुपरिचित आहे. यावरून वेळेचे महत्त्व अधोरेखित होते. वेळेचे गणित जुळवता आले तर पैशांचे ही गणित जुळणे शक्य होते हे सांगण्याची वेळ येणेच लज्जास्पद आहे. नोकरी-व्यवसायांची स्थिती आजही नाजूकच आहे. सर्वकाही आलबेल आहे असे नाही. त्यात या कोरोना टय़ूनच्या ‘डागण्या’ कशासाठी ? यामुळे वेळ वाया जाऊन आर्थिक हानीही होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने देशाच्याच अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. हे लक्षात घेण्यात आले नाही. पह्न लावल्यावर ऐपू येणाऱया कॉलर टय़ूनविषयी वेळेत संपर्क करता येत नसल्याने नापसंतीच व्यक्त होते हे वास्तव आहे. गेल्या काही महिन्यांपासून चालू झालेल्या कोरोना कॉलर टय़ूनने अद्यापही पिच्छा सोडलेला नाही. कोरोना कमी होत आला तरी टय़ून चालूच आहे. काय हा कारभार आहे? नागरिकांच्या वेळेची बचत करून देण्याचे कार्य केव्हा पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी ठोस निर्णय घ्यावा.
आधी कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा होती. तर ती येऊनही आता टय़ून ऐकवणे बंद कधी होणार? याची आतुरतेने प्रतीक्षा असताना लसीकरणाचा संदेश देणारी कलाकार जसलीन भल्ला याच्या आवाजातील नवी कॉलर टय़ून ऐकवणे म्हणजे आगीतून फुफाटय़ात टाकण्याचा प्रकार आहे. नागरिकांत जागृती होण्याविषयी टयून कितीवेळ आणि किती दिवस ऐकवली पाहिजे? याविषयी काहीच सुस्पष्टता नाही. एखाद्या गोष्टीचा जनमानसावर सकारात्मक परिणाम होत आहे की त्यांची हानी होत आहे. याचा कायम अभ्यास असला पाहिजे. कोरोना कॉलर टय़ूनविषयी समोर आलेला अभ्यास गांभीर्याने घेतला पाहिजे. वेळ वाया जात आहे ही गोष्ट नागरिकांच्या केव्हाच लक्षात आले आहे, पण ती संबंधितांच्या लक्षात का आली नाही? की येऊनही कानाडोळा केला आहे? निदान कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना तरी लसीचा संदेश ऐकावा लागणार नाही अशी काही व्यवस्था असल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. म्हणजे ही टय़ून ही सक्तीने ऐकायचीच आहे का?




























































