
हिंदुस्थानात उपलब्ध असलेले सर्व इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यानंतर 50 ते 100 किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक धावू शकतात. मात्र हे स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 8 तासांचा वेळ लागतो. अशावेळी ग्राहकांना 150 से 200 किलोमीटर दूर जायचे असल्यास अडचण निर्माण होते. तसेच स्कूटर चार्ज करताना वेळ ही वाया जातो. मात्र आता बाजारात काही असेही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत, ज्यांना केवळ 5 मिनिटात पुन्हा वापरण्यास तयार केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याच टेक्निक बद्दल माहिती सांगणार आहोत.
बॅटरी स्वॅपिंग
काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानी बाजारात जे इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होते, त्यामध्ये बॅटरी ही फिक्स असायची. ही बॅटरी सहज काढणे शक्य नव्हते. मात्र आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी अशा स्कूटर तयार करत आहेत. ज्याची बॅटरी सहज काढता येईल. अशातच तुम्ही स्कूटरची बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर त्याजागी दुसरी बॅटरी लावू शकता. याने तुमचा बराच वेळ वाचेल. तसेच तुम्ही अधिक लांबचा पल्ला गाठू शकाल.
बॅटरी स्वॅपिंग स्टेशन
केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहेत. असे असले तरी चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे टाळत आहेत. अशातच आता केंद्र सरकार इलेक्ट्रिक बॅटरी उत्पादन क्षेत्रात सक्रिय असलेल्या काही कंपन्यांच्या मदतीने पेट्रोल पंपांवर बॅटरी स्वॅपिंग सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. येथे आपण डिस्चार्ज बॅटरीच्या जागी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी घेऊ शकता, तीही केवळ 5 मिनिटात. याने तुमच्या वेळेची बरीच बचत होऊन तुमचा प्रवास अधिक सुखद होण्यास मदत होऊ शकते.
ही सर्व्हिस सुरु झाल्यास इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना मिळू शकेल. तसेच कमी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरला लांबचा पल्ला गाठण्यात मोठी मदत होऊ शकते.


























































