जालना जिल्ह्यातील देहडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 11 शेळ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देहड येथील गट नंबर 10 मध्ये सकाळी सुगंधाबाई बावस्क यांच्या शेतात 11 शेळ्या हिंस्त्र प्राण्याने मारलेल्या अवस्थेत आठळलेल्या दिसल्या. या शेळ्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या शेळ्याची किंमत 1 लाख 50 हजार रूपये आहे. त्यामुळे बावस्क यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा जि.प.सदस्य नवनाथ दौड त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाला याबाबतची माहिती देत त्यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.

वनविभागाचे कर्मचारी जी.एम.शिगांरे व तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शेतवस्तीवर असलेल्या शेळ्यांवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे सांगितले. परिसरात बिबट्याचा वावर असून त्याने 11 शेळ्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरणात आहे.