
गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या रंगाला (पेंट) ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. स्कप्नातील घर रंगवण्यासाठी नागरिक या पेंटचा मोठय़ा प्रमाणावर वापर करीत आहेत. अवघ्या 12 दिवसांत या पेंटची साडेतीन हजार लीटर विक्री झाली आहे. खादी ग्रामोद्योग आणि जयपूर येथील एका इन्स्टिटयूटने संयुक्तपणे हा पेंट तयार केला आहे.
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, या रंगाची किक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. केवळ 12 दिवसांत साडेतीन हजार लीटर पेंट किंवा रंगाची विक्री झाली आहे. ही विक्री केवळ दिल्ली आणि जयपूरमधील 2 दुकानांतूनच होत आहे. खादी ग्रामोद्योगने आता हा रंग ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहक ऑनलाईन मागणी नोंदवू शकतात.
हानीकारक घटकांपासून मुक्त
शेणापासून बनवलेल्या रंगाच्या तपासणीचे काम अद्याप सुरूच आहे. रंगामध्ये असलेल्या कॉलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंडमध्ये (क्हीओसी) काही हानीकारक घटक असतात, पेटिंग करताना वास किंवा वायु स्वरूपात बाहेर पडतात. यामुळे पेटिंग करणाऱया व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये जळजळ होते. मात्र या रंगात व्हिओसीची मात्रा नगण्य आहे.




























































