पुणे – भरधाव ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव ट्रॅव्हल चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. 31 डिसेंबरला रात्री रेसकोर्स बसस्टॉपजवळ हा अपघात झाला आहे. अमर नबीलाल तांबोळी (वय 42, रा. सिंहगड रोड, पानमळा) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅव्हलचालक तानाजी सिद्धेश्वर दराडे (वय 28) याला वानवडी पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलीस शिपाई महादेव जठार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमर तांबोळी 31 डिसेंबरच्या रात्री हे रेसकोर्स परिसरातून हडपसरच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक केली. यामध्ये अमर हे खाली कोसळून गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक विश्वजित जगताप करीत आहेत.