
एक लहान मुलीने आपल्या वडिलांकडे खाऊ खाण्यासाठी पाच रुपये मागितले. त्यावर बापाने चिडून तिला दारावर आपटले. त्यात चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना असून या प्रकरणी बापाला अटक करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात वैष्णवी या दीड वर्षाच्या मुलीने आपले वडील विवेक उईके यांच्याकडे खाऊसाठी पाच रुपये मागितले. तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात तिला मर असे म्हणून दारावर आपटले. त्यात वैष्णवीला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विवेक उईके यांना अटक केली आहे.




























































