
सराईत गुन्हेगाराचा खून करून त्याचा मृतदेह कोथरूडमधील डुक्कर खिंडीत टाकून फरार झालेल्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने अटक केले.
तेजस दत्तात्रय भालेराव (वय 21 रा. खेचरे, मुळशी) आणि महेश मलिक अहिवळे (वय 23, किरकीटवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जगदीश पारधे असे खून झालेल्याचे नाव आहे.
सराईत जगदीश पारधेचा खून करून फरार झालेले दोन आरोपी बारामतीवरून फुरसुंगी-कात्रज बायपास रस्त्याने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलीस नाईक धनंजय ताजणे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तेजस आणि महेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने जगदीश पारधेचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश पाटोळे यांच्या पथकाने केली.




























































