
चारकोपमध्ये विभाग क्र. 2च्या वतीने आयोजित भव्य मेळाव्यात शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची भावना यावेळी मुस्लिम बांधकांनी व्यक्त केली. या मेळाव्यात शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभा प्रतोद सुनील प्रभू यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना मेळाव्यात मुस्लिम बांधवांनी अशरफ अली खान यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुखांच्या मुस्लिम समाजाविषयी असणाऱया प्रेम आणि संबंधाचा दाखला देत समाजात भेद निर्माण करणाऱया प्रवृत्तीला दूर ठेवण्याचे आवाहन यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. तर तुमच्या साथीने पालिकेकर पुन्हा एकदा भगवा फडकवू असा विश्वास आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात सतीश देसाई, बाळा सावंत यांनीही शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्यासाठी माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही सहकार्य केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी महिला संघटक मनाली चौकीदार, नगरसेविका शुभदा गुढेकर, गीता भंडारी, नगरसेवक शंकर हुंडारे, विधानसभा संघटक संतोष राणे, मधुकर राऊत, अनिल भोपी, नंदू मोरे, संतोष धनावडे, किरण कोळी, उत्तर भारतीय प्रमुख ऍड. कमलेश यादव, उपविभागप्रमुख राजू खान, उदय रुघानी, राजन निकम, समन्वयक सत्यवान वाणी, सायली सुखदरे, आकांशा नागम, सुवर्णा प्रसदे, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, अनंत नागम, श्याम मोरे, मनोज मोहिते, हेतल रुगानी, भास्कर मोरे यांनी परिश्रम घेतले.






























































