चोरीचे दागिने लपवले गटारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नशेसाठी घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जुहू पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली. त्याने 21 लाख 65 हजारांचे चोरी केलेले दागिने गटारात लपवून ठेवले होते. ते दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. तक्रारदार या जुहूच्या नेहरूनगर परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्याच्या नातेवाईकाच्या घरी अज्ञात चोरटय़ाने घरफोडी करून 21 लाख 65 हजाराचे दागिने चोरी केली होती. चोरी प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरी बिरादार यांच्या पथकातील ठाकूर, तोडणकर, यादव, पाटील, भोसले, महांगडे यांच्या पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना त्या अल्पवयीन मुलाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने चोरी केलेले दागिने गटारात लपवून ठेवले होते.