मुंबई निवड चाचणी कबड्डी 18 फेब्रुवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आता कबड्डीचा दम घुमताना दिसणार आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे 18 फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदीर येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा 24 फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी आपला प्रवेश फॉर्म 14 फेब्रुवारीपर्यंत असोसिएशनच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. तसेच या कबड्डी स्पर्धेच्या लढती कबड्डीप्रेमींना पाहायला मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी कबड्डीपटू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.