
हरयाणाची डान्सर सपना चौधरी हिच्या लटक्या झटक्यांनी अनेकजण घायाळ होतात. मात्र लटक्या झटक्यानंतर आता सपना चौधरीने काही लोकांना 4 कोटींचा झटका दिला आहे.
हरयाणवी कलाकार सपना चौधरीने एका कार्यक्रमसाठी काही पीआर कंपनीसोबत करार केला होता. ज्या बदल्यात सपनाने बरेच पैसे घेतले होते. या कार्यक्रमांसाठी सपना व तिच्या काही लोकांनी तब्बस 4 कोटी घेतले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते कार्यक्रम होऊ शकले नाही. त्यामुळे सपना चौधरीने ते पैसे परत देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी ते पैसे परत दिले नाही. सपनाकडे अनेकदा पैशांची मागणी करूनही तिने पैसे दिले नसल्याची तक्रार कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या कंपनीने केली आहे. त्यामुळे सपना चौधरी विरोधात 420, 120, 406 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असूनम सपनाला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
2018 मध्ये सपना चौधरी विरोधात एका कंपनीने पैसे घेऊन कार्य़क्रमाला न आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 2019 मध्ये सपना चौधरीने एका कंपनीविरोधात ठरलेल्या रकमेपेक्षा 2 लाख कमी दिल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.




























































