
हिंदुस्थानमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास पाहता आगामी काळात इलेक्ट्रीक वाहनांचीच चलती असेल असे मत जाणकारांनी दिले आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या बाजारात इलेक्ट्रीक वाहन उतरवत आहेत. आता इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी कोमाकी (KOMAKI) ने आपली नवीन स्कूटी लॉन्च केली आहे.
कोमाकी (KOMAKI) ने कोमाकी एसई ही स्कूटी हिंदुस्थानमध्ये लॉन्च केली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटी तब्बल 125 किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटीची टक्कर 125 सीसीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटीशी होणार आहे.

काय आहे फीचर्स…
– 3KW BLDC इलेक्ट्रीक मोटार आणि डिटॅचमेंट लिथियम आयन बॅटरी
– एकदा चार्ज केल्यावर 100 ते 125 किलोमीटर धावणार असा कंपनीचा दावा
– सिंगल चार्जसाठी फक्त 1.5 यूनिट वीज वापरली जाणार असा कंपनीचा दावा
– टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास
– तीन रायडिंग मोड्स
– लाल, निळ्या, सोनेरी आणि काळ्या रंगात स्कूटी उपलब्ध
– एलईडी डिस्प्ले, मल्टीमीडिया कंट्रोल स्वीच आणि इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर
– फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक

रिमोट लॉकिंग आणि अँटी थीफ्ट सिस्टीम
दरम्यान, कंपनीने कोमाकी एसईला पुढील भागात स्टोरेज स्पेस जास्त दिला आहे. खास म्हणजे यूएसबी चार्जिंग पोर्टही दिले आहे. तसेच यात क्रूज कंट्रोल स्वीचही देण्यात आले असून हिंदुस्थानमधील अन्य कोणत्याही स्कूटीमध्ये ते याआधी देण्यात आलेले नाही. या स्कूटीमध्ये 16 इंचाचा अलॉय व्हील देण्यात आला आहे. तसेच रिमोट लॉकिंग आणि अँटी थीफ्ट सिस्टीममध्ये यात देण्यात आली आहे. या गाडीची किंमत 96 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.





























































