
हरयाणातील एका कॉलेजमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. तसेच दोन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
रोहतकमधील जाट कॉलेजध्ये कोच आणि खेळाडूंवर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता कोणीतरी गोळीबार केला. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जाते. अजूनही मारेकर्यांची ओळख पटलेली नाही.
कॉलेजमध्ये झालेल्या या गोळीबारात सात जणांना गोळी लागली. त्यात प्रदीप मलिक, पूजा आणि साक्षीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमींवर उपचार सुरू आहे.
कोचमधील भांडणामुळे गोळीबार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुस्तीच्या कोचमध्ये भांडण झाले होते. सुखविंदर या कोचने गोळीबार केल्याचे म्हटले जाते. तो गेली अनेक वर्षे कॉलेजमध्ये कार्यरत आहे.




























































