
प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या नावे महाराष्ट्रात सहा ठिकाणी अभ्यास केंद्र सुरु करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे करुन यासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही घोषणा केली. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होणऱ्या विद्याथ्र्यांना आता दिल्ली विंâवा अन्य ठिकाण्ीा जाण्याची गरज भासणार नाही, अशी अद्यावत अभ्यास केंद्रे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या नावे राज्यात सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यात मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती आणि नांदेड या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रासाठी तात्काळ 25 लक्ष रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले. नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या स्वतंत्र शासकीय इमारतीची घोषणाही मंत्रीमहोदयांनी करुन यासाठी 14 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.
नांदेडच्या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, लोकशाही अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, स्व.शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र, महात्मा बसवेश्वर व स्व.विलासराव देशमुख यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून यासाठी 50 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्व.विलासराव देशमुख अध्यासन केंद्र हे लातूरमध्ये होणार आहे. ही अध्यासन केंद्रे दर्जेदार करण्यासाठी वेगवेगळ्या संख्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यापुढे विद्यापीठाच्या परिक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णयही त्यांनी आज जाहीर केला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या गणितीय संकुलाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले असून, विद्यापीठातील सहा संवैधानिक पदे भरण्यास मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक व शिक्षकेत्तर पदांचा आकृतीबंध मंजुरीसाठी प्रयत्न करणे, न्यु मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना मंजुरी देणे, लातूर परिसर व परभणी विद्यापीठ उपकेंद्रांसाठी शासकीय जागा मिळवून देणे, हैद्राबाद येथे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशिएन इन्फरमेशन सव्र्हिसेस रिसर्च सेंटरसाठी मान्यता देणे, सेंटर फॉर एक्सलनसाठी रुसाच्या माध्यमातून निधी देणे, नांदेड येथे प्रि आय ए एस प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, नांदेड विद्यापीठाच्या ऑडिटोरीयम बांधकामाकरिता निधी उपलब्ध करुन देणे याबाबतचे निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रोबोट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. ते अद्यावत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्याचप्रमाणे या परिसरात हळदीमधील कुरुकुमीनचे प्रमाण तपासण्यासंदर्भात नांदेड विद्यापीठ आणि नंदीग्राम अॅग्रो येळेगाव या शेतकरी उत्पादन संस्थेशी सहकारी करार करण्यात आल्याचे सांगून यामुळे राज्यातील हळदी उत्पादक शेतकNयांना त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
































































