
पश्चिम उपनगरातील नशेबाजांना चरसचा साठा उपलब्ध करणाऱया टोळीचा म्होरक्या गुन्हे शाखा युनिट-12 च्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक कोटी दोन लाख रुपये किमतीचा चरसचा साठा जप्त केला होता. शुक्रवारीच पोलिसांनी या आरोपीच्या साथीदाराला एक किलो 800 ग्रॅम चरस साठय़ासह रंगेहाथ पकडले.
युनिट-12 चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शुक्रवारी पुरार परिसरात गस्त घालत असताना त्यांना किसन गौड ऊर्फ साठे व त्याचा साथीदार पोटय़ा हे बॅग घेऊन जाताना त्यांच्या नजरेस पडले. तेव्हा पोलिसांनी दोघांना हटकले असता किसन अरुंद गल्लीचा फायदा घेत पळाला होता. तर पोटय़ाला एक किलो 800 ग्रॅम चरस साठय़ासह पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तावडे व पथकाने शोधमोहीम राबवून पसार झालेल्या किसनला तीन किलो 200 ग्रॅम चरससह पकडले. एक कोटी दोन लाख 40 हजार इतकी या चरसची किंमत असून किसन हा पश्चिम उपनगरात ड्रग्ज पुरविणाऱया टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































