#CoronavirusUpdate – मृतांच्या संख्येत घट कायम, दैनंदिन मृत्यू 100 पेक्षा कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 ऑक्टोबर 2020 पासून, हिंदुस्थानात कोविडच्या मृत्यूदरामध्ये विलक्षण घट होत असल्याचे दिसत आहे. आज हा मृत्यू दर 1.5 (1.43 टक्के) पेक्षा कमी आहे. हिंदुस्थानातील रुग्णांचा मृत्यू दर हा जगातील सर्वात कमी मृत्यू दर असलेल्यांपैकी एक आहे.

आतापर्यंत 1.06 कोटी (1,06,11,731) पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11,016 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा जगातील सर्वाधिक उच्च दर असलेल्या देशांपैकी एक असलेल्या हिंदुस्थानातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्के इतका आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील फरक आज 1,04,74,164 इतका वाढला आहे.

देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्येने 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत, 82 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक अहवाला नुसार, 82,63,858 लाभार्थ्यांचे 1,72,852 सत्रांमधून लसीकरण झाले आहे. यामध्ये 59,84,018 आरोग्य कर्मचारी (पहिले लसीकरण), 23,628 आरोग्य कर्मचाऱ्यांचे (दुसरे लसीकरण) आणि 22,56,212 अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे (पहिले लसीकरण) करण्यात आले आहे.

पहिली लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे 28 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना कोविड 19 लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ झाला आहे. लसीकरण मोहिमेच्या 29 व्या दिवशी (13 फेब्रुवारी 2021), एकूण 2,96,211 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यापैकी 2,72,583 लाभार्थ्यांनी 8,071 सत्रांमधून लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता आणि 23,628 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला.

दिवसागणिक लसीकरणाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. एकूण लसीकरणापैकी 68.55 टक्के लसीकरण हे 10 राज्यांमधून झाले आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.58 टक्क रुग्ण हे 6 राज्यांमधील असल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये एकाच दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक, म्हणजे 5,835 इतकी आढळली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,773 रुग्ण बरे झाले आहेत तर त्यानंतर तामिळनाडूमध्ये 482 इतकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

हिंदुस्थानातील एकूण बाधित रुग्ण संख्यापैकी केवळ 1.26 टक्के रुग्ण संख्या ही सध्या सक्रीय असलेली रुग्णसंख्या आहे. आज हिंदुस्थानातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येचा दर हा 1.37 लाख (1,37,567) पर्यंत खाली आला आहे.

नवीन रुग्णसंख्येपैकी 86.25 टक्के रुग्णसंख्या ही सहा राज्यांमधील आहे.

केरळमध्ये पुन्हा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे, 5,471 इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ती 3,611 इतकी तर तामिळनाडूमध्ये 477 इतकी नव्या रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली आहे.

नवीन मृत्यू संख्येपैकी 78.3 टक्के रुग्ण सहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (38) आढळले आहेत. त्यानंतर केरळ येथे दैनंदिन मृत्यू संख्या 16 तर तामिळनाडू आणि छत्तीसगड येथे अनुक्रमे पाच नवीन मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.