
मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे असे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. उर्वरीत कोळीवाड्यांच्या सीमांकनांच्या बाबतीत लककरच बैठक घेण्यात येईल असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई शहर व उपनगरमधील कोळीवाड्यांच्या सीमांकनासंदर्भात आज ‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे आयोजित बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा.ना.श्री. @AUThackeray जी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/C2WvdHzDbE
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) February 16, 2021
कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावे, अशी सूचना अस्लम शेख यांनी केली.
या बैठकीला महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.































































