कोरोनाने स्पीड पकडला, बीडमध्ये एकाच दिवसात आकडा दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या रिपोर्टमध्ये 30 रूग्ण पॉझिटिव्ह होते. तर शनिवारी दुपारी यात मोठी भर पडली आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी 58 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा गतीमान झाला आहे. शुक्रवारी 30 रूग्णसंख्या असणाNया बीडमध्ये शनिवारी रूग्णांची संख्या 58 वर जावून पोहचली. यात सर्वाधिक रूग्णसंख्या बीड शहरामध्ये आहे. बीड शहरात गेल्या आठवडाभरात मोठी घट झाली होती एकाच दिवशी म्हणजे शनिवारी 25 रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. बीड खालोखाल अंबाजोगाईमध्ये रूग्णांची वाढ कायम आहे. आजही अंबाजोगाईत 13 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आष्टीत 3, धारूर 2, केज 4, माजलगाव 3, परळी 4, पाटोदा 2, शिरूर 2 अशी संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या चिंताग्रस्त आहे. दरम्यान प्रशासन आता सतर्क झाले आहे. शहरातील चौकाचौकात पोलीस प्रशासन मास्क न घालणाNयांवर कारवाई करत आहे. गर्दीच्या ठिकाणीही प्रशासनाची करडी नजर आहे. बीड शहरातील कोचिंग क्लासेस चालकांना नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.